महाराष्ट्र

डाक सेवक शेख सलिमाबी यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर

देगलूर (प्रतिनिधी) देगलूर येथील रहिवाशी असलेले बिलोली तालुक्यातील हिप्परगाथडी येथे ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्यरत असलेल्या शेख सलिमाबी यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक आत्ताच एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या वतीने ग्रामीण भागात पोस्टच्या योजना सर्वापर्यत पहुचत जिद्द चिकाटीने कार्य करणाऱ्या समाजासमोर एक आदर्श महिला म्हणून शेख सलीमाबी यांना आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते 7 मार्च महिला दिवशी मराठवाडा प्रशिक्षण प्रबोधनी सभाग्रह शासकीय दुध डेअरी च्या पाठीमागे जालना रोड, औरंगाबाद येथे देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पञ आताच एक्सप्रेसचे मुख्य संपादक सुग्रीव मुंडे यांनी दिले आहे. पुरस्काराबद्दल भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य रामदास पाटील सुमठांनकर, डाक निरीक्षक बी. ए. मुंडे, पोस्ट मास्तर मिलिंद देवूडकर, माजी डाक निरीक्षक एस एस नानिर, सोसायटीचे संचालक गंगाधर भीलवंडे, अब्दुल रहीम पाशा पटेल, मेलवरसल जमनोर, राजकुमार चोपडे, व्यवस्थपकिय सपादक सुमन पोलशेट्वर, प्रहार जनशक्ती तालुका प्रमुख कैलास येसगे, बिलोलीचे पत्रकार सय्यद रियाज, जावेद अहमद, मुक्रामबादचे पञकार जलील पठाण, शेख अफझल, शेख आसिफ, शेख साजिद, शेख रफिक, सय्यद मोहम्मद, युनूस, आई व मित्रपरिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे