ब्रेकिंगन्यूजः म.रा.प.नि.अमळनेर डेपो ची बस नर्मदा नदीत कोसळली..
दिनांक – १८ जुलै २०२२
खलघाट(म.प्र.)- प्रतिनिधि- मनीष धीमान. म.रा.प.नि.ची अमळनेर डेपो येेेेेेथील बस खलघाट म.प्र.येथील नर्मदा नदी नदीच्या पुुलावरुन नदीत कोसळली असल्याची मोठी घटना नेे परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, म.रा.प.नि. अमळनेर डेपो ची बस क्रमांक एम.एच.४० एन ९८४८ ही इंदूर येथे गेली होती तसेच़ इंदूर ते धुळे असा परतीचा प्रवासात करित असतांना म.प्र.चे धार जिल्ह्यातील खलघाट येथील नर्मद नदीच्या पुलावर चालक एका गाडी ला ओव्हरटेक करित असतांना नियंत्रण सुटल्याने पुलावरचे रेलींग तोडत बस थेट नदीत कोसळल्याची घटना सुमारे आज सकाळी ९:३० ते ९:४५ वाजे दरम्यान घडली असुन बस मध्ये ४० प्रवासी होते. वाहक व चालकासह १९ प्रवासीयांचा मृत्यु व १३ प्रवासी गंभीर जख्मी तसेच ८ प्रवासी बेपत्ता असुन जख्मींना धार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेे असल्ययाची प्राथमिक माहिती मिळाली आहे.अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेत रेसक्यू ऑपरेशन सुरू केले आहे.