जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघ व ब्राह्मण युवा आघाडी शाखा भुसावळ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ.
दिनांक:१८ जुलै २०२२
(प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान)
भुसावळ- जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघ व ब्राह्मण युवा आघाडी शाखा भुसावळ तर्फे दिनांक १७ जुलै रविवार रोजी भुसावळ येथील जुने राम मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संयुक्त विद्यमाने पार पडला. दहावी व बारावीचे मिळून जवळपास ३३ गुणवंत या कार्यक्रमास उपस्थित होते.
त्याच प्रमाणे जळगाव येथील श्री पंकज जी व्यवहारे व त्यांचे सहकारी मकरंद डबीर सर यांनी करिअर कौन्सिलिंग या विषयावर गुणवंतांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव येथील ब्रह्मदंड या मासिकाचे संपादक श्री अजय डोळे व ब्राह्मण महासंघाच्या वतीने सौ हेमलता ताई कुलकर्णी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात आनंदी महिला आघाडी शाखा भुसावळच्या नूतन कार्यकारणीची देखील घोषणा करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघाचे तालुका प्रतिनिधी श्री दीपक पाथरकर गुरुजी व ब्राह्मण युवा आघाडी शाखा भुसावळ चे अध्यक्ष श्री देवेश कुलकर्णी व शिव भोजन थाळीचे संचालक श्री नमा(उमाकांत) भाऊ शर्मा ,तसेच महिला आघाडी व समस्त ब्राह्मण समाजाचे अनमोल सहकार्य लाभले. या प्रसंगी अनिरूद्ध कुलकर्णी, सागर पतकी,देवेश कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, प्रशांत उपासनी, गौरव हिंगवे, जयप्रकाश शुक्ला,आशिष तिवारी, भूषण जोशी, केरालकर गुरुजी, आदि समाज बांधव उपस्थित होते.