3 जून आंतराष्ट्रीय सायकल दिन रॅली काढून साजरा
अमळनेर : प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अमळनेर ऍक्टिव्ह सायकलिस्टस ग्रुप यांच्या संयुक्तविद्यमाने आंतराष्ट्रीय सायकल रायडिंग दिवस साजरा करण्यात आला.
Ride free- Live it या वचनाने सायकलिंग ही आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असून त्याद्वारे इंधनाची देखील बचत होते. अमळनेर – चौबारी- कळमसरे- पाडसरे-मारवड -अमळनेर अशी ५० किमी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ अक्षय न्हाळदे, वरिष्ठ नागरिक किरण मणियार, अनिश कुलकर्णी, सायकलिस्ट ग्रुप लीडर निखिल पाटील, प्रा जितेंद्र पाटील, प्रा विजय साळुंखे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ संदीप नेरकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा अवित पाटील यांनी सहभाग घेतला. खा शि मंडळाचे सर्व पदाधिकारी,प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर शिरोडे, सर्व उपप्राचार्य, रासेयो विभागीय समनव्यक डॉ संजय शिंगाणे, रासेयो जिल्हा समनव्यक डॉ मनीष करंजे, कबचौ उमवि चे रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी प्रेरणा दिली.