महाराष्ट्र
ग्रामविस्तार अधिकारी सपकाळे मारूळ सरपंचाना पाठीशी घालताय का ?

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मारुळ येथील सरपंचानी शासकीय जागेवर इमारत बांधली. तसेच शासकीय टूबेल चा व्यक्तिगत वापर करीत असल्याची तक्रार फारुकी नुरुलहुद्दा यांनी जळगाव येथील जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश गटविकास अधिकारी यावल यांना दिले होते.
संबंधित चौकशी अधिकारी सपकाळे यांनी सदरहू जागेचा अहवाल दिला. परंतु, हा अहवाल सपकाळे यांनी पैसे घेऊन सरपंचाच्या बाजूने दिल्याचं आरोप फारुकी यांनी केला आहे. फारुकी यांना न्याय मिळेल का ?, अशी चर्चा आता गावात सुरु आहे.