जळगाव जिल्हा
स्पीड न्यूज महाराष्ट्र च्या नव नियुक्त प्रतिनिधींचा जळगाव विभागीय कार्यलयात स्नेह मेळावा सपंन्न
जळगाव (प्रतिनिधी) स्पीड न्यूज महाराष्ट्र च्या उत्तर महाराष्ट्र व अमरावती विभागाच्या प्रतिनिधींचा स्नेह मेळावा जळगाव येथील विभागीय कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी स्पिड न्यूज महाराष्ट्रचे ब्युरो चीफ अशोराज तायडे, उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ प्रदीप गोसावी, अमरावती विभाग ब्युरो चीफ मिलींद बोदडे यांच्या उपस्थित नव नियुक्त प्रतिनिधीच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिले व मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव ब्युरो चीफ मकरंद कुळकर्णी, माधुरी शिरसाळे, सुनील सुरवाडे, सतिष बावस्कर, मंगेश वाघोदे, किरण सुरळकर, गजानन बोदडे यांनी विशेष परिश्रम घेतले.