वैजापूर जिल्हा न्यायालय येथून वकिलाची दुचाकी लांबविली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) तालुक्यात खेड्या गावांमध्ये अनेक दिवसापासून चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. चोरट्यांनी वैजापूर जिल्हा न्यायालय येथून चक्क वकिलाची मोटर सायकल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदिप रंगनाथ जाधव (वय ३४ रा. तळेगाव मळे ता. कोपरगाव जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी वरील ठिकाणचा राहणार असुन वैजापुर न्यायालयात वकीली व्यवसाय करुन पोट भरतो. 35000 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनिची सी. टी. 100 मोटारसायकल क्र. एम. एच. 17- सी. जी. 2537 लाल काळ्या रंगाची चेसीज क्र.एम.डी. 2.ए.18.ए.वाय. 4. जे.डब्लु. जी.08703 इंजीन क्र. DUYWJG62131 असा असलेली जुनी वापरती माझी मोटर सायकल वैजापुर न्यायलयातील वकील संघाच्या ईमारती समोरुन दि. 16/02/2022 रोजी 11.00 ते 01.00 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने हॉडल लॉक तोडून चोरून नेली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.