महाराष्ट्रराजकीय

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेथार्थ शिवसेनेचे मूक निदर्शने

सिल्लोड (प्रतिनिधी) राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ सिल्लोड येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मौन बाळगून तसेच तोंडाला काळ्या फिती बांधून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

केवळ विरोधी पक्ष असल्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने अनिल देशमुख, अर्जुन खोतकर ,संजय राऊत आणि आता मंत्री नवाब मलिक यांना लक्ष करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले आहे. नवाब मलिक यांची अटक बेकायदेशीर असल्याने या अटकेचा निषेध व्यक्त करीत लोकशाहीला संपविण्याचे कटकारस्थान केंद्रातील भाजप सरकारने आखले आहे.त्यामुळे देश हुकूमशाहीच्या मार्गाने जात असल्याचा घणाघात महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी भाजपला लगावला. केंद्रातील भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने शासकीय यंत्रणेचा वापर करीत आहे. याविरोधात केंद्र सरकार बोलण्यापासून रोखत असल्याने ज्या महामानवांनी आम्हाला घटना दिली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्यासमोर मौन बाळगून व तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येत असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

भाजप ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करीत आहे असे राजकारण देशाच्या इतिहासात कधीच घडले नाही अशा शब्दांत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले यातूनच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून भाजप महाराष्ट्राची बदनामी करीत असल्याचा आरोप राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर केला.

महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केंद्रातील भाजप सरकारचा जोरदार समाचार घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून या देशामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार करीत आहे. सर्व शासकीय यंत्रणेचा गैर वापर करून केंद्राकडून केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष केल्या जात आहे. जर गुन्हेगार असेल तर नक्कीच कारवाई करा. पण विरोधी म्हणून सूडबुद्धीने होणारी कारवाई निषेधार्थ आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. या राज्याला जाणीवपूर्वक कोणी बदनाम करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिला.

आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, डॉ. मॅचिंद्र पाखरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, गिरीश शाह, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, यांच्यासह नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, शेख सत्तार हुसेन, रतनकुमार डोभाळ ,आसिफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन ,शेख बाबर, राजु गौर, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर, जितु आरके, शकुंतलाबाई बन्सोड, मोईन पठाण , शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण , संजय पा. मुरकुटे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, माजी शहरप्रमुख मॅचिंद्र धाडगे, युवासेनेचे पदाधिकारी धैर्यशील तायडे, शिवा टोम्पे, लखन ठाकूर, शेख इम्रान ( गुड्डू ), रवी गायकवाड, समाधान गोंगे, प्रवीण मिरकर, संतोष धाडगे, फहिम पठाण, योगेश शिंदे, रवी रासने, आशिष कुलकर्णी, आनंद सिरसाट, संतोष खैरनार, सचिन पाखरे, अब्दुल बाशीद, मनोहर आरके, माजी जि.प. सदस्य कौतिकराव मोरे, संजय पा. फरकाडे , मुश्ताक देशमुख, भाई पोपटराव पगारे, पालोदचे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, कैलास इंगे, राजेश्वर आरके, हाजी राजू देशमुख, गजानन शिंदे, गणेश डकले आदींसह शिवसेना , युवासेना ,महिला आघाडीचे पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे