दोंडाईचा शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी अभियान संपन्न
दोंडाईचा (गोपाल कोळी) दोंडाईचा येथे शासकीय विश्रामगृहात शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सर्व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना डिजिटल काँग्रेस सभासद नोंदणीचे आदेश सर्व जिल्हा व तालुका स्तरावर दिलेले आहेत. त्या अनुषंगाने शिंदखेडा तालुक्यात काँग्रेस कमिटीची बैठक धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी कशी करावी याची महत्वाची माहिती व मार्गदर्शन शाम सनेर यांनी दिली. यावेळी उपस्थित युवक काँग्रेस प्रदेश सचिव राहुल माणिक, जयवंत पाटील (पप्पु मालपुर) युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अँड.रामकृष्ण धनगर, राजेंद्र देवरे (पंचायत समिती सदस्य), प्रकाश पाटील (डी.डी.सी. बॅंक सदस्य) सुरायचे भैय्या पाटील, कल्लु पठाण, आबासाहेब मुंडे, राकेश पाटील, रोहित देवरे, जखाणे उपसरपंच प्रविण पवार, वसमाने सरपंच महेंद्र पाटील, युवक कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.