शेतातील गोठ्यास व शेतखोलीस आग लागून एका बैलाचा मृत्यू
येवती (यशवंत सावरीपगार) तालुक्यातील येवती येथे शेतातील गोठ्यास व शेतखोलीस आग लागून एक बैल मरण पावला असून एक बैल, एक, गाय व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. होऊन एक लाख पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
येवती गावचे सरपंच शांताराम वाघ यांचे लहान भाऊ पांडुरंग त्रंबक वाघ यांचे गावा लगतच्या शेतात असलेल्या गोठा व शेतीची औजारे व कुटार, कुट्टी असलेल्या खोलीस रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली .आग लागल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आग विझवली मात्र या आगीत एक बैल तात्काळ मृत्युमुखी पडला तर एक बैल ,गाय, व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जनावरांसाठी साठवून कुट्टी ,कुटार, जळून खाक झाले. यात एक लाख पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे पंचनामा एम. एल. रत्नानी, कोतवाल तुषार सावरीपगार यांनी केला आहे. या आगी बाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात आग नोंद करण्यात आली आहे.