शिवसेनेचा जनता दरबार उत्साहात संपन्न; जनतेने व्यक्त केले समाधान
शिंदखेडा (प्रतिनिधी) : गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठीचे हक्काचे व्यासपीठ बनत असलेला शिवसेनेचा जनता दरबार सोमवार (दि.15) रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी जनतेने स्वत:च्या समस्या घेऊन शिवसेना कार्यालयात गर्दी केली.
शासन दरबारी प्रलंबित किंवा कासव गतीने होणारी सर्वसामान्यांची कामे या जनता दरबारात आल्यानंतर तात्काळ मार्गी लागतात, अशी चर्चा आता तालुक्यातील जनतेमध्ये होत आहे. सर्वसामान्य जनता समाधानी आहे, हिच माझ्या कामाची पावती असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, दोंडाईचा उपजिल्हा संघटक कल्याण बागल, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, तालुका समन्वयक विनायक पवार, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, एसटी कामगार सेनेचे आर.आर.पाटील, माजी शहरप्रमुख सागर देसले, नंदकिशोर पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पवार, डाबलीचे गटनेते रविंद्र सोनवणे, पिरन साळुंके, प्रदीप दिक्षित, साहेबराव मोरे, मनोहर साळुंके, दिलीप चौधरी, रोहित बडगुजर, गोटू भील, डी.डी.चाळसे, संतोष पाटील, धनराज पाटील, सतिष मोरे, विजय माळी आदी उपस्थित होते.