आदिवासी एकता परिषद शिंदखेडा मार्फत बिरसा मुंडा जयंती निमित्त शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र बंगला भिलाटी येथे संपन्न
शिंदखेडा तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत
समाजातील लोक जे ऊस तोडी कामासाठी व विट कामासाठी बाहेर राज्यात गेलेले आहेत त्यांचा मुलांसाठी शिक्षणाची सोय म्हणून शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे आदिवासी एकता परिषद मार्फत हा खास उपक्रम आदिवासी समाजातील मुलांसाठी राबविण्यात आला ह्याचे सर्वत्र कौतुक होत असून समाजानेही मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आदिवासी एकता परिषदेचे आभार मानले व कार्यक्रमाला शिंदखेडा तहसिलदार सुनील सैदाणे यांनी उदघाटन केले व शिंदखेडा पोलीस स्टेशन पीआय सुनील भाबड यांनी प्रतिमा पुजन केले.आलेले प्रमुख पाहुणे- गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे . ,प्राध्यापक सुरेश देसले, प्रल्हाद चौधरी गावीत साहेब इत्यादी उपस्थित होते .कार्यक्रमात नाना कुवर सुरेश सोनवणे उपसचिव भुपेंद्र देवरे यांनी धरती आबा बिरसा मुंडा यांची प्रतिमा पुजन करून त्यांचा इतिहास सांगितला ब्रिटिशां विरुद्ध कशा प्रकारे उलगुलान ( बंड )पुकारले व आदिवासी बांधवांना एकत्र करून जल जंगल जमीन वाचवत ब्रिटिशांची जुलूमशाही स्विकार केली नाही व त्यांना आदिवासींचा चळवळीची जाणीव करून दिली..1857- च्या चळवळीत मोठ्या प्रमाणात विविध राज्यातील आदिवासी क्रांतिवीरांचा इतिहास आदिवासीं समाजा समोर अधापी आलेला नाही म्हणुन समाजातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यावे असे ते म्हणाले..ता.सचिव गुलाब सोनवणे, सल्लागार आप्पा ,सोनवणे, शानाभाऊ सोनवणे,अजय मालचे,जिभाऊ फुले,कैलास मोरे,कैलास मालचे,बबलु मोरे,रणजित बागुल,अमर भिल,गोपाल मालचे,योगेश सोनवणे,सुनिल मोरे,दिपक फुले,सचिन मालचे,पंकज फुले,अनिल दादा पिंपरी,सागर सोनवणे ,
आदी उपस्थित होते.