तळोदा येथील यात्रोत्सवात मोठी उलाढाल
तळोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने गेल्या दोन वर्षांपासून तळोदा येथील कालिकामतेची यात्रा भरली नव्हती त्यामुळे व्यावसायिक यांच्याबरोबर नगरपालिका तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा येथील मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. त्यामुळे या वर्षी प्रशासन तसेच नगरपालिकेच्या वतीने यात्रा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्याप्रमाणे सारंगखेडा येथील यात्रा ही घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे तळोदा येथील कालिका माता यात्रा खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मध्यप्रदेश,गुजरात,तसेच परीसरातील व्यापारी मोठ्या संख्येने बैल घेऊन येत असतात.त्याचप्रमाणे ग्राहक ही मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने बैल बाजारात मोठा उत्साह या ठिकाणी असतो बैलांबरोबरच त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्याची सुद्धा या ठिकाणी विक्री करण्यात येत असते. आज यात्रेचा ३ रा दिवस असून यात्रेत सुमारे ८६७ बैल खरेदी विक्री तुन सुमारे ८० लाखाची उलाढाल झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे सचिव सुभाष मराठे ,सहाय्यक सचिव हेमंत चौधरी तसेच कनिष्ठ लिपिक जयेश सूर्यवंशी यांनी शौर्य मराठीला दिली.
तळोदा शहरातील ग्राम दैवत देवी कालिंका माता यात्रा अक्षय्य तृतीये पासून भरत असते बैल बाजारासाठी खान्देशात प्रसिद्ध आहे सुमारे २१०० च्या आसपास बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत पहिल्या दिवशी सुमारे ६०० बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारात सुमारे ६५ लाखाची उलाढाल झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे पाणी विद्युत रोषणाई सुविधा पुरविण्यात अली आहे यावर्षी पहिल्या दिवशी उलाढालीत निरुत्साह दिसला आहे. विविध बैल व कृषी पूरक खरेदी विक्रीची दुकानही थाटली आहेत.