जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ; शिंदखेडा येथील मिलींद पाटोळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखलप्रकरणी निर्दोष मुक्तता
शिंदखेडा (यादवराव सावंत) दि.१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरे गाव येथे जातीत दंगल घडविणाऱ्या व भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अनेक निरपराध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे महाराष्ट्रात अनेक तरुणांना कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले होते अशात शारीरिक, मानसिक, व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार तात्कालीन भाजप सरकार आहे. चुकीचा पध्दतीने निरपराध तरुणांना खोट्या गुन्ह्यात पैसे भरून निर्दोष मुक्तता करावी असे शासन निर्णय काढण्यात आला होता. या सर्व गोष्टीला झुगारून शिंदखेडा येथील स्वाभिमानी युवा शिलेदार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सच्चा शिलेदार मिलिंद रमेश पाटोळे यांनी अश्या खोट्या आरोपात न्यायालयात कायदेशीर मार्गाने दिवाणी न्यायालय शिंदखेडा येथे आपल्यावर दाखल खोट्या गुन्ह्यात शिंदखेडा न्यायालयात जामीन मंजूर करून घेतला व सदरील केस ही जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली.
जिल्हा सत्र न्यायालयात सर्व सत्य परिस्थिती अवलोकन करून जाब जबाब, पुरावा सादर करून मे न्यायालयाच्या निर्देशात आणून आपली बाजू मांडली. या कायदेशीर लढ्यात मिलिंद पाटोळे सारखा युवा शिलेदार यांनी अनेक संकटांना तोंड देऊन आपला कायदेशीर लढा यशस्वी ठरवत आपल्या भारताची राज्यघटना व न्यायव्यवस्था किती मजबुत आहे हे दाखवून दिले. यातुन होणाऱ्या अन्यायावर कसा लढा देता येईल हे या तरुणाने ह्या लढ्यात दाखवून दिले व अनेकांना प्रेरणा मिळेलच या निकालावरून व आपल्या धाडशी वृत्तीमुळे मिलिंद पाटोळे यांनी सिद्ध करून दाखविले. यावर काल मे जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांनी मिलिंद रमेश पाटोळे यांना निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या या कायदेशीर लढ्यात त्यांची बाजू अॅड. संतोष जाधव यांनी मांडली व न्याय मिळवून दिला. त्याबद्दल मे सत्र न्यायालयालयाचे जाहीर आभार व अॅड. संतोष जाधव व या कायदेशीर लढ्यात माझं मनोबल वाढवून मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहिले असे सर्वांचे आभार मानले.