वसुली 365 दिवसाची पाणी मात्र तीस दिवस बोदवड नगरपंचायतीचा भोंगळ कारभार
बोदवड : शहरामध्ये नगरपंचायत कडून पाणीपट्टी वसुली साठी कर्मचारी फिरत असून 365 दिवसाची वसुली करीत आहे परंतु पाणी मात्र फक्त 36 दिवस देत असल्याचे वृत्त आहे.
याबाबत सविस्तर असे की, बोदवड शहरामध्ये निवडून आलेले नगरसेवक यांनी दर तिसऱ्या दिवशी ते पाचव्या दिवशी पाणी देऊ असे आश्वासन दिले होते.परंतु बोदवड करांच्या नशिबी 365 दिवसांपैकी फक्त 36 दिवस पाणी येत असल्यामुळे जनते मध्ये नाराजीचे सूर निर्माण होतांना दिसत आहे. मात्र नगरपंचायतीचे कर्मचारी जोरात वसुली करीत असल्याचे चित्र समोर दिसत आहे. कर्मचारी कडून माहिती घेतली असता ज्या व्यक्तीकडे नळ आहे त्यांच्याकडून एक हजार रुपये वार्षिक वसुली केली जाते आणि ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडून तीनशे रुपये जनरल पाणीपट्टी वसूल केली जाते.
ज्यांच्याकडे नळ आहे ते 365 दिवसांची पाणीपट्टी भरतात पण त्यांना फक्त छत्तीस दिवसाचे पाणी मिळते वास्तविक बघितले असता 98 रुपये किंवा 99 रुपये त्यांनी 36 दिवसाचे घ्यायला हवे. परंतु तसे न होता सर्रासपणे 365 दिवसांचे पैसे लोकांकडून उकळले जात असल्यामुळे बोदवडकरांमध्ये नाराजी व्यक्त करीत असतानाचे चित्र दिसत आहे. अनेक वेळा पाईपलाईन फुटण्याचे कारण दाखवून पाणी दिले जात नाही त्यामुळे नवीन पाईपलाईन असताना ते फुटते कशी असा प्रश्न जनता करीत आहे. परिणामी योग्य नियोजन करून नेहमी पाईपलाईन फुटणार नाही याची काळजी नगरपंचायतीने व ओडिए महामंडळाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा थर्डआय फाउंडेशन कडून सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल.