धाडरी येथे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर
आर्वी : धुळे तालुक्यातील धाडरी येथे रक्त गट व हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासणी शिबिर भारत विकास परिषद धुळे व विवेक फाउंडेशन धाडरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले.
शिबिरात १८६ मुली व महिलांची तपासणी केली. प्रत्येकाला २५० ग्रॅम काळे फुटाणे व २५० ग्रॅम गूळ मोफत देण्यात आला. यावेळी भारत विकास परिषदचे अध्यक्ष राजेंद्र जाडी, धुळे जिल्हा संयोजक सागर देशपांडे, सुनिल कपिल, धनंजय शुक्ला, डॉ. प्राची शुक्ला, रोहिदास महाले, किशोर ठाकरे, हर्षल चव्हाण, शुभम बच्छाव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धुळे येथील व्यापारी रुपचंद केवलरामाणी व रेखा केवलरामाणी हे उपस्थितहोते. शरिरातील रक्त, अशक्तपणा, आरोग्याच्या समस्या, दंतचिकित्सा विषयावर डॉ. प्राची शुक्ला यांनी सविस्तर माहिती दिली. रुपचंद केवलरामाणी यांनी रक्त वाढविण्यासाठी लागणारी औषधे उपलब्ध करून देऊ असे आवाहन केले. कार्यक्रमाला गावातील जेष्ठ पोपट पाटील, नंदलाल छोरीया, बळिराम पाटील, बापु पाटील, धर्मा पाटील, नाना पाटील, गोरख बच्छाव, कारभारी पाटील, दत्तु पाटील, लखिचंद छोरीया, उत्तम अहिरे, अशोक पाटील, भावलाल पाटील, कैलास पगारे, युवराज देवरे, छोटु अहिरे, खंडु सोनवणे, आदी उपस्थित होते. आभार विवेक फाउंडेशनचे अध्यक्ष रामलाल जैन यांनी व्यक्त केले.