शिंदखेडा येथील पिक संरक्षण सोसायटीच्या नियमित शेतसारा भरणारे दहा शेतकऱ्यांचा गौरव
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील पिक संरक्षण सहकारी सोसायटी कार्यालयात आयोजित केलेल्या नियमित शेतसारा भरणारे दहा शेतकऱ्यांचा डसबिन, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक मोहन परदेशी होते. सुरुवातीला प्रास्ताविकातुन माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश देसले यांनी शहरातील पिक संरक्षण सहकारी सोसायटीच्या माध्यमातून प्रथमच नियमितपणे शेतसारा भरणारे दहा शेतकऱ्यांचा गौरव करणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था असल्याचे सांगितले.
यावेळी सत्कारार्थी दहा शेतकऱ्यांमध्ये इंदुबाई तुळशीराम चौधरी, मिनाबाई पंडित मराठे असलम शेख हैदर, बापु तुकाराम शिंपी, पांडुरंग हरी गुरव,लोटन आत्माराम देसले, कैलास वामनराव तलवारे, दिनेश सुधाकर निकम, लक्ष्मीकांत रामराव ठाकुर, शामराव तुकाराम सोनवणे यांचा डसबिन, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ह्या प्रसंगी चेअरमन विजय पोपट चौधरी उर्फ नाना चौधरी, व्हाय चेअरमन योगेश माधवराव देसले, संचालक अरुण चैत्राम देसले, दिलीप आधार पाटील, बन्सीलाल पितांबर बोरसे, कैलास निंबा पाटील, दत्तात्रय जगन्नाथ देसले, अशोक राजाराम परदेशी, गजानन विश्वास भामरे, यादव प्रेमराज मराठे, विलास अर्जुन मोरे, संचालिका मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे, स्विकृत संचालक सुरेश बाबुलाल महाले, संजय गुलाबराव बडगुजर सचिव मनोहर रामराव भामरे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मोहन परदेशी यांनी सांगितले की, शिंदखेडा शहरातील शेतकरी हितासाठी व संरक्षणासाठी ही संस्था असून दिवसेंदिवस नवनवीन संकल्पना चेअरमन विजय नाना चौधरी व संचालक मंडळाने हाती घेतले आहे म्हणून आज तालुका नव्हे तर जिल्यात शंभर टक्के व नियमित शेतसारा भरणारे शेतकऱ्यांचा गौरव करणारी ही संकल्पना यथायोग्य असुन हया निमित्ताने डसबिन देऊन एक स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आभार सचिव मनोहर भामरे यांनी मानले.