गुन्हेगारीमहाराष्ट्र
पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्त्या
पुणे (प्रतिनिधी) पुणे शहर पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी त्यांच्या विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्त्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सध्या त्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. चव्हाण यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. तसेच कामाच्या बाबतीत देखील त्यांचा दरारा होता. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देण्याबरोबरच ‘इ पास’ची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. भरोसा सेलमध्ये देखील त्यांनी अनेक दिवस यशस्वीपणे कामगिरी पार पाडली.