महाराष्ट्रराजकीय

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : ‘म्याव-म्याव नाही तर तो डरकाळी फोडतो’, भाजपनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 19 जागांपैकी भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली पराभूत झाले आहेत.

जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी चुरशीने मतदान झाले होते. दरम्यान, आज 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरु आहे. यात महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. त्यांच्या विरोधात राणे गटातील विठ्ठल देसाई होते. दोघांनाही १७-१७ मते पडल्याने टाय झाले. अखेर चिठ्ठी काढून विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्यानंतर कणकवलीत राणे समर्थक जल्लोष करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रमोद जठार यांनी, जर भाजप कार्यकर्त्याला कोंडीत पकडले तर तो म्याव-म्याव करत नाही. तर तो डरकाळी फोडतो, अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणानंतर कणकवलीत राजकीय आरोप-प्रत्योरापांनी वातावरण तापले आहे. गुरुवारी कणकवलीत झालेली जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रियाही तणावपूर्ण वातावरणात पार पडली होती. मतदान प्रक्रियेदरम्यान जि. प. अध्यक्ष संजना सावंत आणि महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत यांच्यात मोबाईल नेण्यावरून जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून अनुचित प्रकार टाळला. याप्रकरणी संजना सावंत यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सतीश सावंत यांच्यावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही बाजूंकडून म्याव म्याव आणि कॉक कॉक

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कणकवलीत पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. काल सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर काही उत्साही शिवसैनिकांनी हायवे ब्रिजखाली फटाके वाजवत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर समोरून भाजप कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू असताना दोन्ही बाजूंकडून म्याव म्याव आणि कॉक कॉक असे मांजर, कोंबड्याचे आवाज काढले जात होते. यावेळी उपस्थित पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांच्यामध्ये कडे केले होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे