शिंदखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘जागतिक पोलिओ डे’ रोटरी क्लबमार्फत साजरा
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील रोटरी क्लब ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक पोलिओ डे प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेडा येथे साजरा केला.
क्लबचे अध्यक्ष प्रा गोपालसिंह परमार यांनी जमलेल्या पालक वर्गास पोलिओ ची माहिती देताना म्हणाले की एका टाचणीच्या टोकावर ३० लाख जिवाणू, तर १५० कोटी विषाणू आरामात बसू शकतात. पोटाचे विकार, न्यूमोनिया यासारखे रोग या दोन्हीमुळे होऊ शकतात. जिवाणूंच्या हजारो जाती आहेत. मानवाने जरी वाघ, सिंह, हत्ती, गेंडा यासारख्या अनेक हिंस्त्र आणि शक्तिशाली प्राण्यांना तसेच अतिविषारी साप, वनस्पती, कीटक यांना आपल्या कक्षेत आणले असले तरी, रोग कोणताही असू दे ‘सूक्ष्म जिवाणू आणि अतिसूक्ष्म विषाणू विरुद्ध मानव’ हा संघर्ष पृथ्वीच्या अंतापर्यंत चालणार आहे, हे मुख्यत्वाने लक्षात घ्यावे लागेल.
डॉ विनय पवार (आयुष वैद्यकीय अधिकारी)यांनी यांनी पोलिओ निर्मूलनासाठी जगात अनेक संस्था कार्यरत आहेत त्यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल, राजकीय इच्छाशक्ती व हजारो स्वयंसेवकांच्या प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर भारत पोलिओ मुक्त देश झाला. २७ मार्च २०१४ रोजी तसे प्रशस्तिपत्र जागतिक आरोग्य संघटनेने भारताला दिले. ही फार मोठी कामगिरी आहे. ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन असे ‘आरएनए’वर्गीय पोलिओच्या विषाणूचे तीन प्रकार आहेत. ब्रुनहिल्ड या विषाणूमुळे अर्धांगवायू होतो; तर लॅन्सिंग आणि लिऑन हे विषाणू मज्जारज्जूच्या पेशींवर थेट आक्रमण करीत असल्याने अशी माहिती दिली. पोलिओमयटीसचे विषाणू ५ वर्षाच्या आतीळ बाळांवर लवकर हल्ला करून त्यांना जायबंदी करतात ते होऊ नये म्हणून ही लस अतिशय महत्वाची आहे असे मत प्रतिपादित केले.या प्रोजेक्ट चे चेअरमन रो मयुर ओसवाल हे होते तर प्रोजेक्ट यशस्वीतेसाठी रो देवेंद्र नाईक, रो हर्षल अहिरराव, रो संजयकुमार महाजन यांनी अनमोल सहकार्य केले. आदर्श गाव डोंगरगाव येथे पोलिओ डोस :- शिंदखेडा तालुक्यातील आदर्श गाव डोंगरगाव येथील अंगणवाडी त जागतिक पल्स पोलिओ डोस पाजण्यात आला हयावेळी माजी सभापती व धुळे जिल्हा डी.डी. सी. बॅकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते डोस पाजण्याचा शुभारंभ करण्यात आला. हयाप्रसंगी आशा सेविका साधना पाटील व महिला कर्मचारी उपस्थित होते.