निसर्ग मित्र समितीच्या वतीने कष्टकरी महिलांचा सन्मान
साक्री/कासारे (प्रतिनिधी) निसर्ग मित्र समितीच्या मालपूर व कासारे शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदिवासी कष्टकरी 40 महिलांचा साड्या व फराळ देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले हे होते, तर प्रमूख पाहूणे म्हणून उषाबाई पाटील सौ. रत्ना पाटील, अंजिरा बाई सोनवणे, रोहिणी शिंदे, भावना नांद्रे, निसर्ग मित्र समितीचे तालुका कार्याध्यक्ष सुरेशभाऊ पारख, तालुका उपाध्यक्ष प्राचार्य बी. एम्. भामरे, समितीचे पिंपळनेरचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप सावळे,सदस्यांत, प्रा के डी कदम, प्रा.डाॅ. अजय नांद्रे, कृषी अधिकारी रिंकू बोरसे, पी. बी. गांगुर्डे चंद्रजीत भामरे, नंदलाल नांद्रे ओंकार बच्छाव सुरेश पवार व मिलिंद नांद्रे आदि उपस्थित होते.
या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकेतून प्राचार्य बी.एम् भामरें यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्वत्र विविध मानाच्या पदांवर कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान केला जातो परंतू आदिवासी व कष्टकरी महिलांचा देखिल सन्मान करण्याचा मानस निसर्ग मित्र समितीचा होता म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे नमूद केले.
या प्रसंगी मालपूर च्या रामनगर या आदिवासी वसाहतीतल्या 40 महिलांना सांड्या व फराळ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सुरेश भाऊ पारख यांनी आपले गाव दत्तक घेतले असून आपल्या वसाहतीच्या आरोग्य,शिक्षण व गॅस सिलिंडर-शेगड्या आदि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी व्यक्तीशहा व समिती बांधिल असल्याचे सांगितले.
अध्यक्ष पदावरून विलास देसले म्हणाले की, तुम्ही प्रत्येक महिला आपल्या कुटुंबाच्या शिल्पकार असून आपण कष्टकरी असलो तरी मिळणा-या तुटपुंज्या मजुरीतूनही काटकसर व आपल्या मुलांना शिक्षीत करून कुटुंब पुढे नेवू शकता हा विश्वास दिला. आगळ्या वेगळ्या साजरा केलेल्या या कार्यक्रमाबद्दल भावना नांद्रे व उषा पाटील यांनी निसर्ग मित्र समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कौतूक व अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती च्या सर्व पदाधिकारींनी परिश्रम घेतले.