शिंदखेडा जवळील कुमरेज येथील गायत्री शक्तीपीठ गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणीय संदेश
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील नामांकित असणारे गुरुकुलातील १० वी च्या विद्यार्थ्यांनी कुमरेज येथील गायत्री शक्तीपीठ येथे आंबा, पेरू , रामफळ , सीताफळ,कल्पवृक्ष, जांभूळ, बेल, जास्वन्द इ वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडांची लागवड करून पर्यावरणीय संदेश देत “झाडे जगवा, जीवन जगावा” चा नारा दिला.
यात १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी अनोखी अशी सामाजिक जाणिव ठेऊन आपली भूमिका ही राष्ट्रीयतेची जपणूक करणारी आहे. असे आपल्या कृतीतून दाखवून दिले. गुरुकुलाचे मार्गदर्शक अध्यापक संजयकुमार महाजन व गायत्री धाम मधील महाराज जगदीश भागवत यांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. गायत्री मातेची पूजा करून व मंत्रोच्चाराने पुनीत परिसरात इ १० वी च्या शुभम धनगर, युवराज माळी, तेजस माळी, ओम माळी, मयुर माळी, तुषार बेहरे, कुणाल भदाणे, कृष्णा देसले, प्रणव विसपुते, धर्मेश माळी, कृष्णा पाटील, स्पर्श साळवे, निलेश माळी, गणेश अहिरे, इ सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. शुभम धनगर याने आमच्या अध्यापकांचे संस्काराची शिदोरी ही आयुष्यभर पुरेल व ती आम्ही कायमस्वरूपी आमच्या आचरणात आणू असे मत प्रतिपादित केले.



