प्रतापपुर आदिवासी सोसायटीची निवड बिनविरोध
चेअरमनपदी किरण पावरा तर व्हाइस चेअरमनपदी सुरेश इंद्रजित
बोरद : तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथील आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. चेअरमनपदी किरण रोहिदास पावर यांची तर व्हाइस चेअरमनपदी सामाजिक कार्यकर्ते सुरेश इंद्रजीत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतापपुर (ता. तळोदा) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीतून आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीवर संचालक म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र सर्व मतदारांनी समन्वयाने गावातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. प्रतापपुर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किरण पावरा तर व्हाइस चेअरमनपदी सुरेश इंद्रजित यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक म्हणून डॉ. शशिकांत जगन्नाथ वाणी, साहेबराव काशिराम चव्हाण, बटेसिंग राजपूत, गोरख लकडू मोरे, रमण पुनाजी पावरा, दिगंबर चांद्या वसावे, तुकाराम बन्सी मोरे यांची निवड झाली आहे. उर्वरित संचालक म्हणून स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रक्रिया प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक नीरज चौधरी, घनश्याम बागल उपस्थित होते.