पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
नवी दिल्ली : मंगळवारी कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरच्या पुढे गेली. कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र आज दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यानी मंळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. युक्रेन संकटामुळे रशियन तेलावरील बंदी वाढवली जात आहे. अशा परिस्थितीत स्वस्त दरात कच्चे तेल रशियाकडून मिळत आहे.
दरम्यान, आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारला कठीण जाणार आहे.
4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई – मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.
दिल्ली – दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.
चेन्नई – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.
कोलकाता – कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.