पिंपळगाव बुद्रुक येथील ॲक्वा थंड पाण्याची मशीन शोपीस
ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष ; लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे
भुसावळ (सतिश बावस्कर) महाराष्ट्र शासनाने थेट ग्रामपंचायत कडे गावाच्या मूलभूत सुख सुविधा राबवण्यासाठी थेट निधी योजनेचा भाग म्हणून 14 वित्त आयोग आपल्या गावात मूलभूत विकास व नागरिकांच्या प्रमुख सुखसुविधा करण्यासाठी याकडे प्रामुख्याने पाहिले जाते. या 14 वित्त आयोग सन 2015 मध्ये ग्रामपंचायत पिंपळगाव बुद्रुक गावाचा विकास कृती आराखडा ग्रामसभेत सर्वमुते करण्यात आला.
त्यावेळी सर्वांनी गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्यात स्वच्छ पाणी नसल्याने गावात अशुद्ध पाणी पिल्यामुळे छोट्या-मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते जेणेकरून ह्या समस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी गावात ॲक्वा मशीन आवश्यक आहे जेणेकरून स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल व सुख-दुःखात कार्यक्रमात उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी आवश्यक असल्याची संकल्पना गावकऱ्यांनी मांडली व उषा बाबुराव सरोदे (सरपंच) व त्यांचे सहकार्य ग्रामसेवक बोदडे यांनी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले ॲक्वा थंड पाण्याची मशीन बसवण्यात यशस्वी झाले ते मोजून दोन वर्ष होण्याअगोदर त्याकडे ग्रामसेवक व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष व त्यांचे कोणतेही देखभाल दुरुस्ती केली नाही व खरेदी वेळेस त्यांचे कंपनीकडून देखभाल दुरुस्तीसह खरेदी केल्याचे बोलले जाते. मात्र ते सध्याच्या परिस्थितीत ग्रामपंचायत मध्ये शोपीस म्हणून धूळ खात आहे. त्यानंतर नवनिर्वाचित विद्यमान सरपंच तसेच लोकप्रतिनिधी यांना सुद्धा एक वर्ष पूर्ण होत असता त्यांनीसुद्धा ॲक्वा थंड पाणी मशीन याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. याकडे ग्रामसेवक यांचे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे गावामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे .याकडे विद्यमान कर्तव्यदक्ष सरपंच या बद्दल काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.