महाराष्ट्र
११ व्यक्तींची जेवणाची व्यवस्था करणार : शिवशंकर काळे
लातूर : आपल्या गावामध्ये जे कोणी अनाथ आहेत व वयोवृद्ध यांना मुलबाळ नाही, मूलबाळ असून सुद्धा आई वडीललांना विचारत नाहीत, अशा ११ व्यक्तींची जेवणाची व्यवस्था करणार आहे. मी एक तुमचा मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून, माझ्याकडून दोन टाईम चे जेवण देणार आहे, कुठलाही जातीधर्माचा असुद्या माझ्याकडे जात धर्म नाही एक तुमचा मुलगा म्हणून मदत करेल, असं शिवशंकर मुकुंद काळे म्हणाले.
यावेळी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक, माहिती अधिकार कार्यकर्ता नांदेड जिल्हा संघटक, नांदेड जिल्हा पोलीस मित्र जनसंपर्क प्रमुख, उस्मान नगर ग्रामपंचायत सदस्य व विरोधी पक्षनेता, सामाजिक कार्यकर्ता जनतेचा सेवक आदींचे सहकार्य लाभणार आहे.