महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट ‘उद्धव ठाकरे’ : नवनीत राणा
नवी दिल्ली : “महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत असल्याचं अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय.
दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे पोहचले आहेत. राणा दाम्पत्यानी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केले, यावेळी दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, यावेळी समर्थकांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणाही लगावल्या.
मी घाबरणार नाही, थकणार नाही. महिलांना घाबरवून जेलमध्ये डांबणं हे मान्य नाही तसेच इतकी कमजोर देशातील स्त्री मुळीच नाही, महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.



