संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचा धुळे दौरा
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार मा.सुप्रिया ताई सुळे ह्या दिनांक 16 मे 2022 रोजी धुळ्याचा दौरा करणार आहेत.
सुप्रिया ताई सुळे ह्या सकाळी 10 वाजता हॉटेल स्पाईस ट्रिट येथे यशस्विनी सामाजिक अभियानाच्या बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता आय.एम.ए. हॉल येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य, शिक्षण, शेती आणि वन संर्वधन या विचार संवाद कार्यक्रमाला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, संतोषी माता चौक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे धुळे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय, येथे हरिजन सेवक संघाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय एकात्मता संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता जळगांवकडे प्रयाण करतील. असे राष्ट्रवादी काँग्रसेचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी कळविले आहे.