महाराष्ट्र
गरुड मैदानावर विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
धुळे : येथील गरुड मैदानावर विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या 12 दिवसात सहाय्यक क्रीडा संचालक पुणे येथील उदय पवार व संघटनेचे कार्यध्यक्ष डॉ नरेश बागल यांच्या विशेष सहकार्याने व विद्यापीठ/राष्ट्रीय खेळाडू निखिल मोरे मंदीपसिंग पंजाबी मार्टिन खैरनार यांचे खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. हँडबॉल शिबिराच्या समारोपाला धुळे जिल्हा हँडबॉल संघटनेचे सचिव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे यांच्या उपस्थितीत मॉर्निंग डाएटचे वाटप झाले. त्यांच्या सोबत खो खो NIS मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, निखिल मोरे, मंदीपसिंग पंजाबी, मार्टिन खैरनार, भरत ठाकूर, रवी बागुल आदी उपस्थित होते.