नेवरे येथे शहापुर तालुका कृषी विभाग यांच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व तयारी कार्यक्रमाचे आयोजन
शहापुर : तालुक्यातील मौज नेवरे या गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये कृषी विषयक योजनांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखविणे तसेच क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळा पिक भात यासाठी शहापुर कृषी विभाकडुन प्रमुख पाहुणे कृषी अधिकारी रविंद्र घुडे तसेच कृषी अधिकारी अशोक सिनकर कृषी अधिकारी खर्डी तसेच कृषी सहाय्यक अधिकारी व्हि. एम शिर्के हे आवर्जुन उपस्थित राहिले.
खरीप हंगाम पूर्व तयारी करताना शेतकर्याने बियाणे निवड करताना घ्यावयाची काळजी मान्यता प्राप्त व योग्य प्रकारचे त्यावर सील व बियाणाचे लेबल असावे त्यावर संबंधित अधिकार्याची सही असावी. खरेदीची पावती, जात, प्रकार, प्लॉट क्रमांक, उगवण शक्ती, अनुवंशिक शुद्धता, अंतिम दिनांक यांची खात्री करावी तसेच कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, मोगरा, सोनचाफा लागवड व हळद लागवड तसेच MAHA DBT अंतर्गत योजनेतुन मिळणारी कृषी अवजारे व यंत्र याविषयी माहिती दिली. अन्नप्रक्रियेवर आधारित लघुउद्योग कसे उभारता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
कृषी अधिकारी अशोक सिनकर यांनी जमिनीची मशागत तसेच बियाणावर बिज प्रक्रिया करून उत्कृष्ठ बियाणे कसे तयार करता येईल याविषयी प्रात्याक्षिक करुन मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक अधिकारी व्हि.एम. शिर्के यांनी शेतकरी वर्गांनी जास्तीत जास्त योजनांचा फायदा कसा घेता येईल. ती योजना कोणत्या शेतकर्यांसाठी राबविता येईल. मग्रारोहयो अंतर्गत रोजगार कसा उपलब्ध करता येईल तसेच त्यासाठी जॉब कार्ड कसा महत्वाचा आहे. तो कसा काढायचा या विषची माहिती सांगितली. तसेच जास्तीत जास्त शेतकर्यांनी फळ बागायती लागवड करावी तसेच या गावात उद्भवणा ऱ्या पाण्याच्या समस्येवर काय करता येईल. त्यासाठी सर्व ग्रामस्थांचा सहभाग किती महत्वाचा आहे.
तसेच शेती विषयक नव नविन योजना संदर्भात माहिती मिळण्यासाठी दर पंधरा दिवसांनी शेती कार्यशाळा राबविता येईल. तसेच यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक ग्रुप तयार करून जागृती निर्माण केली पाहिजे असे सांगितले. त्यानंतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.