धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीचा पिक विमा मिळवून देणार : कृषी मंत्री दादासाहेब भुसे
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यात गेल्या महिन्यात झालेली गारपीट तापी काठावरील गावांचे झालेले नुकसान याचा अहवाल कृषी विभागामार्फत आलेला असून पिक विमा कंपन्यांना सर्व तोपरी मदत देण्याचे सूचित केले जाईल असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी आज शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना दिले शिंदखेडा येथे एका खाजगी कामानिमित्त राज्याचे कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे आले होते. स्थानिक विश्रामगृहावर यांनी भेट देऊन शिवसेना पदाधिकार्यांशी संवाद साधला. यावेळी नामदार दादासाहेब भुसे बोलत होते.
पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी 72 तासाच्या आत ऑनलाइन तक्रार केली पाहिजे .याबाबत आता शेतकरी जागृत होऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शासन शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी असे असे आदेश ना. दादासाहेब भुसे यांनी दिले. यावेळी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, शिवसेना जिल्हा संघटक मंगेश पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, तालुकाप्रमुख गिरीश पाटील, शहर प्रमुख संतोष देसले, उपशहर प्रमुख किशोर पाटील, भाईदास पाटील, सर्जेराव पाटील, बेटावद येथील विभाग प्रमुख गणेश सोनार आदी उपस्थित होते.