धाडरे धाडरी येथील कै चुडामण आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न
धुळे (करण ठाकरे) कै चुडामण आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय धाडरे धाडरी ता. जि. धुळे व जिल्हा परिषद शाळा धाडरे येथे दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी ७३वा प्रजासत्ताक दिन कोविड-१९ च्या नियमाचे पालन करून उत्साहत साजरा झाला. यावेळी धाडरे व धाडरी ग्रामपंचायतचे आजी व माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील गावातील जेष्ठ नागरीक मुख्याद्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ध्वज पुजन जेष्ठ नागरीक भास्कर व मुख्याद्यापक सावंत आर जी यांनी केले तर ध्वजारोहण शसतोष महादु पाटील माजी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राजाराम भिका पाटील यांनी भुषविले. कार्यक्रम प्रसंगी प्रा राजेंद्र ओंकार परमार यांच्यातर्फे त्यांच्या स्व. मातोश्री व स्व. पिताश्री यांच्या स्मरणार्थ इयत्ता १० वी परीक्षेत समाजशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५०१ रुपये व इयत्ता १० वीत भूगोल विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५०१ देण्यात आले. तसेच विद्यालयात प्रथम येणारा विद्यार्थी यास प्रा राजेंद्र ओंकार परमार सर यांच्या कडुन स्व ओंकार नंदा परमार व स्व पार्वता आई यांच्या स्मरणार्थ १००१ रुपयांचे बक्षिस मुख्याद्यापकाच्या हस्ते देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा पाइरे येथे ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विवेक फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामलाल भाऊ जैन व त्यांच्या मातोश्री मंगला जैन, मुख्यध्यापिका नागरे गवळे, शिक्षक पालक संघ अध्यक्ष शंकर शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर जिभाऊ जाधव तसेच ग्रामस्थ माजी सैनिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ध्वजारोहणाचे संचलन क्रीडा शिक्षक एस एम बोरसे यांनी केले तर फलख लेखन सोनवणे वाय डी यांनी केले. सुत्र संचलन एस पी जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन व्ही एन पाटील यांनी केले.