जि.प. प्राथमिक केंद्रीय शाळा व कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी
चिमनपुरी पिंपळे (प्रतिनिधी) जि. प. प्राथमिक केंद्रीय शाळा चिमनपुरी पिंपळे व कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम राजेंद्र बारकू पाटील (SSB NSG commando), सुनिल सुभाष काटे (SSB) व सुरेंद्र सूर्यवंशी मुख्याध्यापक यांच्या हस्ते संपन्न झाला. ग्रामपंचायत येथे पंकज उमराव पाटील (SSB NSG commando) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी, सैनिक पंकज उमराव पाटील (SSB NSG commando), राजेंद्र बारकू पाटील (SSB NSG commando), सुनील सुभाष काटे (SSB), शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजू देवचंन पाटील, उपशिक्षक राजाराम नामदेव माळी, सुनिल दौलत वाघ, पदवीधर शिक्षिका मीना अभिमान सोनवणे, वंदना भालचंद्र पाटील, दर्शना देवीदास पाटील, वैशाली भाऊसाहेब देवरे, कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र दयाराम सूर्यवंशी, उपशिक्षक जगदीश शांताराम पाटील, अरविंद तोतारांम पाटील, दगडू बारकू पाटील, डी. जी.पवार, उद्धव पाटील, योगेश जाधव, रुपाली निकम, लिपिक राजाराम दंगल साळुंखे, शिपाई पाटील, केद्र प्रमुख रवींद्र पाटील व ग्रामपंचायत माजी सरपंच योगेश अशोक पाटील, सरपंच दिनेश प्रेमराज पाटील, सदस्य बाळू महादू पाटील, दिलीप पाटील, गणेश मोतीराम पाटील,भैय्या बारकू पाटील, हरीलाल महादू पाटील व ग्रामस्थ युवराज दगा पाटील, अशोक राजाराम पाटील, किरण उमाराव पाटील, शिवदास पाटील, बापु पाटील, बापू नारायण चौधरी, बारकू भिल, पोलीस पाटील राजेंद्र माणिक पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक किशोर प्रकाशराव पवार, आदि मान्यवर उपस्थित होते.