आरोग्य व शिक्षणजळगाव जिल्हा
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोनाची लागण
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांनी दिवसभर आराम केला. आज गुरूवारी २७ जानेवारी रोजी सकाळी कोरोना चाचणी केली. डॉ. मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुढील काही दिवस होम क्वारंटाईन होणार आहेत.



