ब्रेकिंग

शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावातील 28 शेतकऱ्यांना पिक कर्जाचा प्रश्न हेमंत साळुंखे यांनी जनता दरबारात लावला मार्गी

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील हेमंत साळुंके शिवसेना जिल्हाप्रमुख जनता दरबाराच्या माध्यमातून वाडी गावातील पीक कर्जाचा अठ्ठावीस शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावला व स्वतः बँकेचे मॅनेजर यांना फोन करून सांगितले आणि गेल्या एक वर्षापासून बँक मॅनेजरने या अठ्ठावीस लोकांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली होती परंतु हा प्रश्न वाडी ग्रामस्थांनी आपल्या जनता दरबारात मांडला आणि त्याच दिवशी त्या विषयात हात घातला आणि बँक मॅनेजर यांना फोनवरून त्वरित कर्ज देण्याच्या सूचना केल्यात.

आठ दहा दिवसाच्या कालावधीत बँक मॅनेजर यांनी 28 शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल वाडी ग्रामस्थांतर्फे आपले मनपूर्वक आभार असेच आपल्या हातून गोरगरीब जनतेचे काम होत राहावीत अशा प्रकारच्या वाडी गावातील शेतकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सदर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी शिंदखेडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गेल्या वर्षापासून सातत्याने आठवडा बाजार साधुन शहर व शिंदखेडा मतदारसंघातील सर्वसामान्य, शेतकऱ्यांसाठी , गोरगरीब जनतेसाठी खुले व्यासपीठ जनता दरबाराच्या माध्यमातून उघडले असून त्याबाबत अनेकदा विविध प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यालयात अधिकारी यांच्या कडे चकरा माराव्या लागतात. तासनतास, परिणामी निरुत्तराने खाली हात परतावे लागते.समस्या, प्रश्र्न कुणाकडे घेऊन जाव्यात यासाठीच हया जनता दरबाराचा उदय झाला. म्हणुन वर्षभरात अनेक अडचणी दुर करण्यास यशस्वी झाले.

यासाठी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हा मंगेश पवार, भाईदास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, तालुकाप्रमुख गिरीश देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, शहरप्रमुख संतोष देसले, चंद्रसिंग ठाकुर, सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होवून समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी कार्यालयातील रुपेश मराठे, दिपक साळुंखे हे कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत. शहर व तालुक्यातील हया जनता दरबाराचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे