आदिवासी पड्यावरील स्त्रियांना सलग चौथ्या महिन्यातील सॅनिटरी पॅड वाटप-प्रकल्प “सक्षम”
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या अंतर्गत सक्षमीकरण उपक्रम
धुळे (प्रतिनिधी) स्त्रियांना होणाऱ्या मासिकपाळीच्या त्रासाने आणि त्यावेळी दूषित कापड वापरून होणाऱ्या रोगाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने प्रकल्प “सक्षम” अंतर्गत के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे आणि सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा हा चौथा महिना असल्याने महिलांना पॅड वापराची सवय लागत असल्याचे निरीक्षणास आले आहे.
अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सलग चौथ्या महिन्यात सॅनिटरी पॅड वाटप केले गेले, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी तीन वाजता हा उपक्रम नियमित राबविण्यात येत असतो. या वेळी सदगुरु सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन म्हसे यांनी पॅड उपलब्ध करून दिले.
या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सहसचिव चेतन उपाध्याय, अश्वघोष पवार, स्वयंसेविका दिव्या सावळे, प्रियंका विसपुते, कल्याणी मोरे, राखी बडगुजर, गौतमी कुलकर्णी, दिव्या गवळी, हर्षदा जाधव, रेणुका कोठावदे, साक्षी जाधव, प्रतीक्षा राणा, संजना सरग आदी उपस्थित होते.