प्राध्यापक इंगळे यांच्या गीतास फिल्म फेस्टिवल विशेष पुरस्कार
साक्री (सतीश पेंढारकर) येथील मुकुंद नगरातील रहिवासी व निजामपुर जैताने येथील जगन्नाथ कडवादास शाह वरिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे व्याख्याता प्राध्यापक अजाबराव इंगळे यांनी लिहिलेल्या व विकास जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या संगीत नुत्य मय गीत चित्र लघुपटाला अजिंठा सिल्लोड येथील आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट व्हिडिओ व बेस्ट एक्टर चा प्रथम पुरस्कार देऊन गौरव गौरविण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत ४८ देशांतून विविध लघुपट सहभागी करण्यात आले होते. प्राध्यापक इंगळे हे निजामपुर जैताणे वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत ते बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोराला बाजार येथील मूळ रहिवासी असून त्यांना साहित्य गीत लेखन संगीत नृत्य अभिनय दिग्दर्शन आदी कलांमध्ये विशेष रुची आहे ते सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएचडी करीत आहेत. त्यांचा एक कवितासंग्रह सुद्धा प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
सदर विशेष सन्मानाबद्दल त्यांचे अध्यक्ष शरदभाई शाह, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉक्टर अशोक खैरनार, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच साक्री येथील प्राध्यापक एल जी सोनवणे, कवी रावसाहेब कुवर, सतीश पेंढारकर, डॉक्टर दिलीप लोखंडे, वीरेंद्र बेडसे, नरेंद्र खैरनार, प्राध्यापक सुधीर कासार, शरद मोरे, नितीन जगदाळे व कला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे.



