महाराष्ट्र
तालुका शिवसेनेच्या वतीने स्व. दादासाहेब पालोदकर यांना अभिवादन
सिल्लोड : सहकार महर्षी स्व. माणिकराव (दादासाहेब) पालोदकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील स्व. दादासाहेब पालोदकर मार्ग येथे नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अ. सत्तार यांच्याहस्ते स्व. दादासाहेब पालोदकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल,शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, शिवसेना वैद्यकीय आघाडीचे डॉ. मॅचिंद्र पाखरे, उपशहर प्रमुख संतोष धाडगे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, जुम्मा खा पठाण, शंकरराव खांडवे, विशाल जाधव, युवासेनेचे अक्षय मगर, आशिष कुलकर्णी, आरेफ पठाण, संजय मुरकुटे, अकिल देशमुख, साहेबराव गोराडे, फहिम पठाण आदींची उपस्थिती होती.