महाराष्ट्र

बेलदार संघाचे कार्य कौतुकास्पद : पुरुषोत्तम आवारे

अकोला : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त बेलदार सेवा संघाने आयोजित केलेल्या ‘गौरव गुणवंतांचा’ या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी मध्ये नेत्रदिपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थी व कर्तृत्ववान समाज बांधवांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

 

गुणवंत विद्यार्थी राज्यस्तरीय सत्कार सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून अकोला शहराच्या महापौर अर्चनाताई मसने, जयंतराव मसणे हे उपस्थित होते. स्थानिक जि. प. कर्मचारी भवन येथे आयोजित या सोहळ्याचे प्रमुख वक्ते अजिंक्य भारत दैनिकाचे मुख्य संपादक पुरुषोत्तम आवारे यांनी आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनातून जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण कष्ट, अभ्यास आवश्यक असतो. राशिभविष्य हे कसे थोतांड आहे, नशीब नावाची कोणतीही गोष्ट जगात अस्तित्वात नाही हे सोदाहरण सांगितले. हातावरील रेषा आपले भविष्य ठरवीत नसतात, मेहनतीला पर्याय नाही हा विचार तरुण पिढिने अंगी बाणावा, तसेच बेलदार सेवा संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे बेलदार या भटक्या जमातीतील गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन बेलदार सेवा संघातर्फे केले जाते. समाजातील गुणीजनांना तसेच कोरोना काळात सेवा दिलेल्या आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त तहसीलदार मोतीरामजी रामचवरे, प्रमुख अतिथी म्हणून बेलदार सेवा संघाचे राज्य अध्यक्ष जयराम मुंडाले, महादेवराव सुलताने, महादेवराव मुंढे, पंडितराव सैरिसे, बेलदार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तेजराव बिलेवार, संजयजी पांडे, लक्ष्मणराव चौके, मोहन मुंढे, ज्योतीताई सैरिसे, आनंदराव हनवते, मुरलीधर भगेवार, रूपचंद घटे, श्रीकृष्ण बिलेवार, अरुण मांजरे, भगवान पाखरे, देविदास बघे, रामेश्वर बघे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष आतुलकर कैलास सुलताने, रवींद्र पाखरे (PSI), रुख्मिणी रामचवरे, श्याम कुणबीथोप, डॉ. शेखर बिल्लेवार, दिनेश पांडे, रविंद्र रावणचवरे, यशवंत सावरीपगार, नामदेवराव बिलावर, प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य ज्येष्ठ पत्रकार सुभाष हातोलकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तेजराव बिलेवार यांनी केले.

 

कार्यक्रमाचे संचालन संदीप बाजरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री, सेवानिवृत्त न्यायाधीश एम. पी. बगे, संजय घटे, गुलाबराव मांजरे, स्वप्निल रताळे, पवन मेहेंगे, भीमराव घाटे, डॉ. अंजली गवार्ले, राजू मुंढे ,मंगेश थोप, दिलीप मेंगे, देवानंद बिलेवार, रामकृष्ण मेहेंगे, ब्रह्मदेव भोंगरे, पवन घटे, अक्षय मुंढे, सचिन भोंगरे, रघुनाथ सुलताने, सागर मांजरे, मुरलीधर सुलताने, विलासजी बघे, मनीष रामचवरे, मुरलीधरजी बगे,संजय सैरिसे, संतोष पाखरे, अनिल मुंढे, गणेश कुणबीथोप, लक्ष्मी सैरिसे, अविनाश मेंगे, तुषार सुलताने, संतोष मुंढे, रोशन बिलेवार, सतीश भोंगारे, विशाल भोंगारे, आकाश सुलताने, ज्ञानेश्वर शिरकरे, अंकुश सुलताने, गणेश सुलताने, स्वप्निल रामचवरे तसेच सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे