वीर सैनिक ग्रुप देगलूरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
देगलूर (प्रतिनिधी) वीर सैनिक ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देगलूर शहरात राबविण्यात येत आहेत. जसे की – कोरोना काळात अहोरात्र आरोग्य सेवा करणारे डॉक्टर्स आणि मेडिकल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे “कोरोना वारियर्स” म्हणून सत्कार करून त्यांच्या कार्याला कृतज्ञता व्यक्त करण्यात आले व त्यांचे आभार मानण्यात आले.
दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी वीर सैनिक ग्रुपतर्फे देशसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत सुट्टीवर आलेल्या जवानांतर्फे प्रजासत्ताक व हुतात्मा दिना निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शहीद भगतसिंग चौक देगलूर येथे करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम रक्तदान करुन अनुसया मुतकवार यांनी एक आदर्श देगलूर वासियांना समोर ठेवून उपस्थित लोकांमध्ये प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. याचा परिणाम म्हणून जास्तीत जास्त लोकांनी स्वउत्साहाने संध्याकाळपर्यंत ७० जणांनी रक्तदान करून या कोरोना काळात या सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. या शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी – पाण्याची बॉटल चाय -बिस्कुट व फळे आणि फराळाची उत्तम अशी सोय केली होती. रक्तदान करण्यासाठी उपस्थित लोकांना प्रोत्साहन करण्याचे कार्य बालाजी चुकलवाड (अध्यक्ष माजी सैनिक संघटना नांदेड), रा.कां. पा.युवा तालुका कार्याध्यक्ष देगलूर व प्रसिद्ध पत्रकार मोहम्मद शेख मोईन आणि कैलास येसगे प्रहार पक्षाचे तालुका प्रमुख यांनी “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हीच खरी मानव सेवा आहे.” त्यामुळे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे मत प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला देगलूर बिलोली चे लाडके आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर, जिल्हा अध्यक्ष भाजपा व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार सुभाष पिराजीराव साबणे, देगलूर नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेठवार, सभापती कृ.उ. बाजार समिती देगलूर अनिकेत पाटील राजूरकर, विरोधी पक्ष नेते अविनाश निलमवार, नगरसेवक प्रशांत दासरवार, माजी नगर सेवक सुनील येशमवार, वि. प्रमुख भाजपा दिगंबर सावरकर कोरवार, विकास पाटील मोरे, संजू अण्णा जोशी, यादव गोरलावार, साई गंदपवार, अमोल येशमवार या राजकीय मान्यवरांनी तसेच माऊली हॉस्पिटलचे डॉ.काळे व माजी सैनिक विकास समिती संघटनाचे मराठवाडा अध्यक्ष नारायण कारामुंगे, जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड, कार्यकारी अध्यक्ष के के पवार, भोकर तालुका अध्यक्ष अर्जुन कांबळे, देगलूर तालुका अध्यक्ष मारुती भासवाडे, संघटक बाबुराव कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली व उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने रक्तपैकेट संकलन करणे व रक्तदान करणाऱ्या सन्मानित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याचे कार्य केले तसेच हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी देगलूर नगरीचे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ चे सर्व नियमांचे पालन करून हे उपक्रम यशस्वी करण्यात उत्साहपूर्वक सहकार्य केले.
या सामाजिक उपक्रमाला सेवारत सैनिक व माजी सैनिक यांनी उत्साहपूर्वक सहकार्य केले. यामध्ये रुपेश बत्तलवाड, संतोष बरसमवर, अंकुश जाधव, श्रीकांत रुपनर, स्थानीय मित्र मंडळी- सन्मुख कोंडेवाड यशवंत बरडवार, अमोल येशमवार ,आदिनाथ अटपलवार, बालाजी बोडके, शत्रुघन पायलावार, विठ्ठल आयनलवार, बालाजी कोरेवार, साई कोंलकोंडवार, अविनाश अनमूलवार, आणि या उपक्रमाचे सूत्रसंचालन देगलूर नगरीचे प्रसिद्ध समाजसेवक सूर्यकांत रामन्ना सुवर्णकार यांनी केले. या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शनामध्ये सुबेदार संतोष केंचे, सुबेदार राजू निलमवार, प्रविण देवडे, दत्तात्रये मैलागिरे व वीर सैनिक ग्रुपचे सर्व सदस्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे प्रतिपादन रुपेश बत्तलवाड यांनी केले.