मूकबधिर विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय वाचन कौशल्य स्पर्धेत यश
अहमदनगर (प्रतिनिधी) अपंग शिक्षण मंडळ संचलित इस्लामपूर डॉ. व्ही एस नेर्लेकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी डॉ. कलाताई जोशी स्मृती करंडक, अहमदनगर यांचे वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन राज्यस्तरीय कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या वाचा कौशल्य स्पर्धेत यश संपादन केले. अवंतिका संदीप कदम वयोगट (९ ते १२) द्वितीय क्रमांक तसेच प्रणिता दिलीप पाटील हिने वयोगट १५ ते १८ मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.

अहमदनगर जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवडे यांचे हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्याताई जोशी, डॉ. ओजस जोशी, प्राध्यापक डॉक्टर जयंत क्षीरसागर, रश्मी पांडव, विद्यालयाचे मुख्याध्यापक आरोटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून पुणे नाशिक ठाणे मुंबई अहमदनगर जळगाव जिल्ह्यातून ९१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ग्रामीण भागातील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे या स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आल्या.

पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका सुनीता खोत यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आनंदराव खडके, उपाध्यक्ष सतीश महाडिक (दादा), संस्थेचे सहसचिव अभिमन्यू पाटील, खजिनदार शोभाताई पाटील, संचालिका सुरेखा पाटील, संचालक ओंकार पाटील यांनी केले.



