आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यात ६ बंधाऱ्यांना मंजुरी ; ३८६ हेक्टर क्षेत्राला लाभ
धुळे (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येऊन शेतकरी सुखी समृद्ध व्हावा म्हणून आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यात सहा न्यांच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी एकूण ३ कोटी ३५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या बंधाऱ्यातून धुळे तालुक्यातील सुमारे ३८६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी नेहमीच रस्ते व ग्राम विकासाबरोबरच शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे त्यानुसार नाला खोलीकरण व रुंदीकरणाबरोबरच शासनाच्या विविध योजनेतून नवीन बंधाऱ्यांची मंजुरी तसेच जुने बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामासही निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यात विविध ठिकाणी एकूण सहा कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांना आमदार कुणालपाटील यांनी मंजुरी मिळवून घेतली आहे त्यात कौठळ को.प. बंधारा (१ कोटी १७ लक्ष ४६ हजार रुपये), धाडरे सा.बं. (६६लक्ष ५१ हजार रूपये ), लामकानी सा. बं. (४० लक्ष ४ ३ हजार रूपये), शिरुड सा. बं. ( २९लक्ष११हजार रूपये ), जापी सा. बं. (१६लक्ष६ २हजार रूपये) आर्णी सा. बं. (६१लक्ष२२हजार रूपये) या नवीन बंधाऱ्यांचा समावेश आहे. बंधाऱ्यांच्या बांधकामानंतर बंधारा क्षेत्रातील सुमारे ३८६ हेक्टर शेतीला सिंचनासाठी लाभ होणार आहे.
त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे बागायती क्षेत्रामध्ये वाढ होण्यास मदत होईल. सदर बंधारे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली असून यासाठी निधी मिळावा म्हणून आमदार कुणाल पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बंधाऱ्यांच्या कामासाठी निधी मिळवून दिला त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.