शिंदखेडा येथील बंगला भिलाटी येथे वीर एकलव्य पुतळा बसविण्यासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना भिल समाज विकास मंचचे निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने बंगला भिलाटी भिल वस्ती नगरात वीर एकलव्याच्या पुतळा उभारण्यात यावा यासाठी नगरपंचायत चे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
शिंदखेडा शहरात भिल समाजातील वस्ती मोठ्या प्रमाणावर असुन बंगला भिलाटी येथे बरीच वर्षांपासून वास्तव करीत आहेत.कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या भागात आदिवासी समाजाचे दैवत वीर एकलव्याचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याने नगरपंचायतने ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा उभारण्यासाठी ठराव केले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन , बंगला भिलाटी येथे वीर एकलव्याच्या पुतळा उभारण्यासाठी व बसविण्यात यावा असा ठराव केला जावा यासाठी भिल समाज विकास मंचच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक दिपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देण्यात आले. ह्यावेळी नगरसेवक उदय देसले, माजी नगरसेवक गणेश सोनवणे , सुनील सोनवणै, अनिल मालचे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.