महाराष्ट्र

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मातोश्री सर्जिकल केअर सेंटरचे उदघाटन संपन्न

सिल्लोड ( विवेक महाजन , प्रतिनिधी )

सिल्लोड : सिल्लोडच्या आरोग्य सुविधेत आमूलाग्र बदल झाला असून येथील डॉक्टरांच्या चांगल्या उपचार पद्धतीमुळे शहरातील डॉक्टरांनी रुग्णांचा विश्वास संपादित करून सर्वत्र आपली ओळख निर्माण केली आहे असे स्पष्ट करीत मातोश्री हॉस्पिटलने सिल्लोड येथे कृत्रिम केस प्रत्यारोपण व कॉस्मेटिक सर्जरीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने गरजूंना याचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे केले.
सिल्लोड शहरातील टिळक नगर भागातील मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक सर्जरी तसेच अनोरेकटर ( मूळव्याध ) विभाग सुरू केले. या सुविधेचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, डॉ. संजय जामकर, डॉ. मॅचिंद्र पाखरे, औरंगाबाद येथील निमाई हॉस्पिटलचे डॉ. संतोष मदरेवार, डॉ. राहुल लोणीकर, डॉ. शुभदा लोणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. शेखर दौड व शहरातील इतर डॉक्टरांनी आरोग्य सेवे सोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नसल्याने प्रत्येकाने खबरदारी घेवून कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, ज्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घेवून तालुक्यात 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांनी सिल्लोड येथे तालुक्याच्या प्रमाणात सर्वाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध असून सिल्लोड हे आरोग्य सेवेचे हब असल्याचे स्पष्ट केले.

सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांनी मातोश्री हॉस्पिटलच्या नवीन उपक्रमास शुभेच्छा देत सिल्लोड येथे आरोग्याच्या विविध आजरा विषयी उपलब्ध होत असलेल्या व तज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णांना औरंगाबादला जाण्याची गरज भासत नसून येथील डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रस्तावित मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. शेखर दौड यांनी केले तर जी. बी. दौड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक विशाल जाधव, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, मतीन देशमुख, मनोज झंवर, राजू गौर, रईस मुजावर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, डॉ. नाना भवर, आशिष कटारिया, प्रवीण कटारिया, रवींद्र राजपूत, डॉ. चेतन झंवर, डॉ. निलेश मिरकर, डॉ. सुष्मा मिरकर, डॉ. वैशाली दौड, डॉ. प्रकाश नवल, डॉ. भाऊसाहेब तायडे, डॉ. विशाल आकाते, डॉ. गोठवाल , डॉ. शिंदे, डॉ. चौधरी आदींसह शहरातील डॉक्टर्स, व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे