महाराष्ट्र

वरखेडे गावात यात्रेच्या नावाखाली सर्रास चालणारे अवैध धंदे तात्काळ बंद करावे मागणी

धुळे (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील वरखेडे गावातील बहिरम देवाची यात्रा दरवर्षी चैत्र शुक्ल म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी असते यात्रेच्या नावाखाली अवैध धंदे सर्रास सुरु असतात. त्यात पत्यांचे क्लब, दारु विक्री आदी अवैध धंदे सुरु असतात तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांना आळा घालून आदर्श यात्रा साजरी करण्यांचे ऐतिहासिक कार्य करावे अशी मागणी होत आहे.

दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे वरखेडे गावातील बहिरम देवाची यात्रा बंद होती यावर्षी दि 2 एप्रिल 2022 रोजी साजरी होणार आहे. यात्रेनिमित्त गावात दोन तगतरावाची मिरवणुक, बारागाडी ओढण्यांचा कार्यक्रमासह दोन तमाशाचा कार्यक्रम होतात यात्रा एकाच दिवसाची असली तरी गावात पंधरा दिवस अगोदरच यात्रेचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते याचे महत्वाचे कारण म्हणजे गावात यात्रेच्या नावाखाली काहीजण पत्यांचे क्लब सुरु करत असतात. त्यामुळे संध्याकाळ पासून गावाच्या मुख्य रस्त्यावरुन वापरणारे मोटरवाहनाची रहदारी वाढलेली दिसते बहिरम महाराज मंदिराच्या समोरच दक्षिणेकडील भागाकडे मंडप टाकून सर्रास पत्यांचे क्लब सुरु केले जातात. यावरुन यात्रेचे निमित्त पुढे करुन काही महाभाग अवैध धंदे चालवून युवापिढीला व्यसनाच्या आहारी लावण्यांचे काम करत असल्यांचे दिसून येते. याबाबत तालुका पोलीस स्टेशनचे कार्यमग्न पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी संबंधीत पोलीसाना कल्पना देवून जे कोणी अवैध धंदे करीत असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यांचे सांगितले असताना सुध्दा त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसून येत नसल्यांचे चित्र मंडप टाकून पत्यांचे क्लब सर्रास सुरु केल्यांचे दिसून येते यावरुन स्थानिक पोलीसाचे आर्थिक हितसंबंधातून सदरचे अवैध धंदे चालत तर नाही ? असा प्रश्न उभा राहतो. याकडे पोलीसानी जातीने लक्ष घालून यात्रेच्या नावाने सुरु केलेल्या पत्यांचे क्लबची जी प्रथा सुरु झाली आहे तिला कायमचा आळा घालावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

गावातील बहिरम देवाच्या यात्रेत सर्रास चालणारे पत्यांचे क्लब कोणाच्या आर्शिवादाने चालतात अशी चर्चा गावात सुरु आहे. तत्कालीन पोलीस अधिक्षक साहेबराव पाटील, एस चैतन्य, विश्वास पांढरे, राजकुमार यांनी जसे वरखेडे गावाची बहिरम देवाची यात्रा अवैध धंदे मुक्त साजरी करण्यांसाठी संबंधीताना आदेश दिला. तसा आदेश पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी द्यावा आणि यात्रेच्या नावावर चालणारे अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे