बापूजी फाउंडेशनतर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा
गोंडगाव ता.भडगाव (सतीश पाटील) राजकारणी व सामाजिक नेत्यांच्या अनेक पोस्ट विविध कार्याच्या ठिकाणी पहावयास मिळतात. जसे की, आता बारावीची परीक्षा सुरू आहे त्या बस स्टैंड वर जाताना कोणी विद्यार्थी उभा दिसला की त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत घेऊन जावे एवढे तरी सेवाभावी वृत्ती ठेवा अशा अनेक मेसेज आपल्याला पहावयास मिळतात. मात्र, प्रत्यक्षात कृती करणारे फारच कमी असतात. याला अपवाद ठरले आहे. भडगाव येथील शिवसेना नगरसेवक लखीचंद पाटील यांनी स्वतः बापूजी फाउंडेशनमार्फत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक केंद्रावर जाण्यासाठी मोफत बस व्यवस्था केली आहे
एसटीचा संप विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली होती .गरीब विद्यार्थ्यांसाठी जाण्यायेण्याची सोय नव्हती. जिथे सर्व कमी तिथे बापूजी युवा फाउंडेशन यांची हमी याप्रमाणे लखीचंद पाटील यांनी भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची मोफत बस सेवा उपलब्ध केल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.