‘असा लुच्चा पंतप्रधान…’ ; सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टिकेनंतर दीपाली सय्यद यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली होती. “असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहीला नाही,” असे सोमय्या म्हणाले होते. यावरुन आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. दिपाली सैय्यद यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात दिपाली सैय्यद म्हणाल्या की, “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा *@#*%@% (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल” अशी खोचक टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
सोमय्यांचीही जीभ घसरली
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना आक्षेपार्ह शब्द वापरला. सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वापरलेला तोच आक्षेपार्ह शब्द आता शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद यांनी वापरला आहे.