गुन्हेगारीमहाराष्ट्र
१६ वर्षीय तरुणाकडून पिस्तूल जप्त ; पोलिसात गुन्हा दाखल
धुळे (विक्की आहिरे) धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावातील एका सोळा वर्षाच्या तरुणांकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
हा तरुण आयटीआय या शाखेचे शिक्षण घेत असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल व जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रकाश माळी यांच्या तक्रारीवरून नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे.