चोपडा महाविद्यालयात १६ फेब्रुवारी रोजी होणार प्रांतअधिकारी व पोलीस उपअधिक्षक यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात येत्या १६ फेब्रुवारी २०२२ वार बुधवार रोजी दुपारी ३ वाजता ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले आहे. कला, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक या सर्व क्षेत्रात वर्षभर नाविन्यपूर्ण कामगिरी करून गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच शैक्षणिक वर्षात कठोर परिश्रम घेऊन, जिद्दीने आणि मेहनतीने आपल्या अभ्यासाच्या बळावर उच्च गुणवत्ता संपादन करून यश मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी ‘वार्षिक पारितोषिक समारंभाचे’ आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये मा.प्रांताधिकारी सीमा अहिरे व भास्कर प्रभाकर डेरे, पोलीस उपअधिक्षक चोपडा, यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा आशाताई विजय पाटील आणि संस्थेच्या सचिव ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, सर्व विद्याशाखांचे उपप्राचार्य आदि उपस्थित राहणार आहे. सदरील समारंभ हा पूर्णपणे covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे. तरी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ समिती प्रमुख के. एस. क्षीरसागर यांनी केले आहे.