राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते राष्ट्रज्योत उद्देशपत्रिका प्रस्तावनाचे प्रकाशन
सिल्लोड : राष्ट्रज्योत बहुउद्देशीय विकास समितीचे अध्यक्ष एन. डी. आहिरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या राष्ट्रज्योत उद्देशपत्रिका प्रस्तावना चे प्रकाशन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
उंडणगाव ता. सिल्लोड येथे रविवार ( दि.29 ) रोजी हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उंडणगाव येथील प्रसिद्ध कव्वाल शाकेर – जाकेर यांच्या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, पं. स. सदस्य शेख सलीम, डॉ. तानाजी सनान्से, राजाराम पाडळे, अजित पाटील, बाबुराव पंडित, मोतीराम पाडळे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, बाळासाहेब वाघ, सयाजी वाघ, विजय नाईक , अमोल नाईक, जब्बार टेलर, शिवसेना उपतालुका प्रमुख नानासाहेब रहाटे, अंभई चे सरपंच रामदास दुतोंडे, संजय धनवई, सय्यद नासेर, विठ्ठल वाघ, शेषराव सनान्से, पप्पू खंडेलवाल, सुरेश गवळी, मोसीन देशमुख, फय्याज देशमुख आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रज्योत समितीचे अध्यक्ष एन. डी. आहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.